कोमसाप रत्नागिरी युवाशाखेच्या वतीने २९ नोव्हेंबरला कथाकथन
रत्नागिरी, दि.२५, प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी युवाशाखेच्या वतीने बुधवार दि.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरीतील अ.के.देसाई हायस्कूल मध्ये कथाकथन आयोजित करण्यात आले आहे. या कथाकथनमध्ये लेखक ज्ञानेश्वर पाटील यांची पाऊल तिचं आणि दुर्गेश आखाडे यांची अपहरण ही कथा सादर होणार आहे.
या कथाकथन कार्यक्रमासाठी अ.के.देसाई हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद शेखर, कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, जिल्हा सचिव राजेश गोसावी उपस्थित राहणार आहेत.कथालेखक ज्ञानेश्वर पाटील यांची खुराडं आणि मावळतीचा इंद्रधनु हि दोन नाटकं राज्य नाट्य स्पर्धा आणि कामगार कल्याण नाट्यस्पर्धेत सादर झाली आहेत.त्यांच्या कविता दिवाळी अंकात प्रकाशित झाल्या.कथालेखक दुर्गेश आखाडे यांनी ‘प्र.ल.’ हा माहितीपट तयार केला असून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर चार वेळा प्रसारित करण्यात आला आहे.अधिक अधिक वजा या बालनाट्याचे पुस्तक प्रकाशित असून हे नाटक व्यवसायिक रंगभूमीवर आले आहे.
www.konkantoday vom