व्यापारी बंधूनी लवकरात लवकर नियमात न बसणाऱ्या सर्व दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठीत कराव्यात-मनसेचे व्यापारी महासंघाला आवाहन
रत्नागिरी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांची भेट घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत व्यापारी बंधूनी लवकरात लवकर नियमात न बसणाऱ्या सर्व दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठीत कराव्यात असे आवाहन करण्यात आले. व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष निखिल देसाई हे ही यावेळी उपस्थित होते.
मराठी पाट्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या मुंबईतील व्यापारी संघटनांना फटकारत सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यात पाट्या नियमांप्रमाणे मराठीत करा असा आदेशच दिला होता ही मुदत दि. २५ नोव्हेंबर रोजी समाप्त होत असून त्या पार्श्वभूमीवर मनसे तर्फे हे आवाहनपत्र देण्यात आले. ही मुदत संपल्यावर मनसेचे शहरातील नियमबाह्य पाट्यांवर विशेष लक्ष असेल असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
www.konkantoday.com