कोकण रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार
बोगदा बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या उतार स्थिरीकरणाशी संबंधित डिझाइन, रेखाचित्र आणि सुरक्षितता पैलूंचा आढावा घेण्यासाठी कोकण रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांनी, तसेच या दोन्ही विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
कोकण रेल्वे आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. याअंतर्गत कोकण रेल्वे आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विविध कामांत विविध स्तरांवर सहकार्य करणार आहे. अत्यंत दुर्गम भागात कठीण स्थितीत बोगदे व मार्ग उभारणीची अनेक कामे कोकण रेल्वेने यापूर्वी यशस्वी केली आहेत. कोकण रेल्वेचा हाच अनुभव लक्षात घेता बोगदा बांधकामात अत्यंत सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्याच्या दिशेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)ने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.
www.konkantoday.com