स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने “रेल्वे मधील चोरी प्रकरणात”एका इसमास घेतले ताब्यात


दिनांक 08/10/2023 ते 09/10/2023 च्या दरम्याने एक कुटुंब वडोदरा, गुजरात येथे जाण्याकरिता गोवा येथून मडगाव-नागपूर या एक्सप्रेस ट्रेन ने प्रवास करीत होते.
हा प्रवास लांबचा असल्याने प्रवासा दरम्यान हे कुटुंब आपले सर्व किमती सामान आपल्या डोक्याजवळ घेऊन झोपून प्रवास करत होते. चिपळूण रेल्वे स्टेशन येथे रेल्वे थांबल्यावर या कुटुंबाला जाग आली व आपल्या साहित्य सामानाची खात्री केली असता त्यांना त्यांची शोल्डर पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. या पर्स मध्ये त्यांचे दोन किमती मोबाईल व इतर महत्वाची कागदपत्रे होती.
चिपळूण पोलीस ठाणे येथे याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर 271/2023 भा.दं.वि.सं.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांच्या मार्फत समांतर तपास सुरू होता.
या रेल्वे मधील चोरीच्या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला, गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला एक मोबाइल हा मोहम्मद सादीक इजाज अहमद कमानघर, वय 26, रा. 101, रामनगर बेटीम रईस मागोस गोवा, मुळ रा. कम्बार स्ट्रीट, मालापूर, धारवाड, राज्य कर्नाटक, हा मडगाव गोवा येथे वापरत असल्याचे निष्पन्न झालेले होते.
पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन परबकर, स्थानिक गुन्हे शाखा, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या गुन्ह्याच्या अधिक तपास गोपनीय व तांत्रिक माहीतीच्या आधारे करून आरोपी मोहम्मद सादीक इजाज अहमद कमानघर, वय 26, रा. 101, रामनगर बेटीम रईस मागोस गोवा, मुळ रा. कम्बार स्ट्रीट, मालापूर, धारवाड, राज्य कर्नाटक, सध्या रा. मार्गो म्युन्सिपल गार्डन मडगाव, राज्य-गोवा यास मडगाव, राज्य गोवा येथून दिनांक 23/11/2023 रोजी ताब्यात घेण्यात आले.
सदर आरोपीत याच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल (मोबाईल) व अन्य चोरीचे 2 मोबाईल असा एकण ₹32,000/- किंमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आलेला आहे.
या आरोपीस पुढील चौकशी करिता चिपळूण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
ही कारवाई, खालील नमूद पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी केलेली आहे,
1) पोलीस उपनिरीक्षक श्री. योगेश खोंडे, स्थानिक गुन्हे शाखा
2) पो.हवा/909 विजय आंबेकर,
3) पो.हवा/1407 दिपराज पाटील व
4) चालक पो.कॉ/215 अतुल कांबळे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button