
महिला बचतगट भवनचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन
*रत्नागिरी, दि.24 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) महिला व बालविकास सशक्तीकरण योजना ३% राखीव निधी अंतर्गत, महिला बचतगट विक्री केंद्र तथा महिला बचतगट भवनचे भूमिपूजन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आठवडा बाजार येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती माविमचे जिल्हा समन्वयक अंबरिश मिस्त्री यांनी दिली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे खासदार विनायक राऊत, सुनिल तटकरे, आमदार सर्वश्री प्रसाद लाड, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, योगेश कदम जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, मुख्याधिकारी तुषार बाबर तसेच विशेष निमंत्रित म्हणून उद्योजक रविंद्र सामंत, सिंधुरत्न समिती सदस्य किरण सामंत उपस्थित राहणार आहेत.
विशेष निमंत्रित उद्योजक रविंद्र उर्फ आण्णा सामंत , सदस्य सिंधुरत्न समृद्ध योजना उपाध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे किरण सामंत या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी या भुभिपूजन सोहळास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वय अधिकारी अंबरीश मिस्त्री यांनी केले आहे.
www.konkantoday.com