बंदी असूनही टेरव येथे कोळसा भट्ट्यांना ऊत
कोकणात उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही गेल्या काही वर्षापासून टेरव येथे कोळसा भट्ट्या धगधगत आहेत. मात्र ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर झालेल्या तक्रारीनुसार वनविभागाच्या अधिकार्यांनी तीन ठिकाणी धाडी टाकून दोन कोळसा भट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. तसेच भट्टीसाठी रचून ठेवलेला लाकूडसाठाही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघा संशयितांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे.
कोकणात कोळसा भट्टीवर बंदी आहे तरीही पावसाळा संपल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून टेरव येथे कोळसा भट्टी धगधगत असल्याची चर्चा होती. त्यातच आता टेरव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर कोळसा भट्ट्यांवर कारवाई झाल्याचे दिसत आहे. २० नोव्हेंबर रोजी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा मौजे टेरव येथील क्षेत्रीय फिरती दौरा असताना वेतकोंड पाण्याची टाकीपासून साधारण १ कि.मी. अंतरावर डोंगर भागात विनापरवाना झाडतोड करून व त्या पासून अंदाजे ६,५०० घनमीटर इतका तयार केलेला लाकूडसाठा हा कोळसा भट्टीसाठी रचून ठेवलेल्याचे निदर्शनास आले.
www.konkantoday.com