
पूरग्रस्त व्यापार्यांकडून कराची पावती मागणे गैर आहे – अशोक पवार
अतिवृष्टीमुळे लहान मोठ्या व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले. या व्यापार्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून आता त्यांच्याकडे कराची पावती, शॉप ऍक्ट लायसन्स अशा विविध कागदपत्रांसाठी ससेमिरा मागे लावण्यात येत आहे. मुळात सर्व दुकानात पाणी शिरून सर्व वाहून गेल्यावर ही कागदपत्रे राहतील कशी असा साधा प्रन प्रशासनाला पडत नाही का? की व्यापार्यांच्या मजबुरीचा फायदा उचलत त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रशासनाचा हा डाव आहे असा संतप्त सवाल राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष व पुरग्रस्त व्यावसायिक अशोक पवार यांनी उपस्थित केला आहे.
www.konkantoday.com