आंजर्ले समुद्र किनारी बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवण्यात यश

दापोली १६:- आंजर्ले समुद्र किनाऱ्या वर नव्याने सुरु झालेल्या बीच ऍक्टिवीटी मुळे समुद्रात पोहायला गेलेल्या पर्यटकाचे प्राण वाचले.

रविवार दिनांक १६ मार्च रोजी पहाटे समुद्रात काही पर्यटक पोहायला गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने एक पर्यटक बुडू लागला होता. सोबतच्या पर्यटकानी समुद्रालग असलेल्या मकरंद महादलेकर यांना माहिती दिली.

त्यांनी माजी सरपंच संदेश देवकर यांना फोन करून कल्पना दिली संदेश देवकर हे मुंबईत असून देखील त्यांनी तत्काळ बाळा केळसकर यांना संपर्क केला एका ही क्षणाचा वीलंब न करता सोबतच्या सहकाऱ्यांना घेऊन बुडणाऱ्या पर्यटकाचे प्राण वाचवले. सूरज रहाटवळ.व त्याच्या सहकार्यानी तत्परता दाखवत हे साहसी काम केले.समुद्रकिनारी समुद्र दर्शनासाठी हजर असलेल्या बोटी.मुळेच हे शक्य झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत,,,,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button