राज्यात अवकाळी पावसाचे ढग
सध्या राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणआहे. त्यामुळं अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी हवामानाच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नेमकी ही स्थिती का झाली आहे, यासंदर्भातील माहिती देखील खुळे यांनी दिली आहे.
मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व 7 आणि खान्देश, नाशिकपासून ते सोलापूर पर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील सर्व 10 तसेच धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूरगडचिरोली अश्या महाराष्ट्राच्या एकूण 23 जिल्ह्यात कार्तिक एकादशी दरम्यान 23 ते 24 नोव्हेंबर केवळ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
www.konkantoday.com