बाईपण भारी देवा! सुप्रिया सुळेंनी साडी नेसून केलं मोटर फ्लाईंग
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोटर फ्लाईंग केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी या मोटर फ्लाईंगचा हवेत उडतानाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.जेजुरी शहरामध्ये मोटर फ्लाईंगला सुरूवात झाली आहे, या उपक्रमाला चालना मिळावी म्हणून सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आणि मोटर फ्लाईंगचा आनंद घेतला. जेजुरी पठारावर सुप्रिया सुळे यांनी मोटर फ्लाईंग केलं.
जेजुरीमध्ये मोटर फ्लाईंगचं हे मशीन स्पेनवरून आणण्यात आलं आहे. जेजुरी दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी मोटर फ्लाईंगच्या मशीनविषयी माहिती जाणून घेतली.
www.konkantoday.com