देवरूख शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभिकरण कामास सुरूवात

देवरूख शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुशोभिकरणाचे काम नगर पंचायतीने हाती घेतले असून या स्मारकाचे रूपडे पालटणार आहे. चवदार तळ्याचा सत्याग्रह देखावा खास आकर्षण ठरणार आहे. स्मारकाच्या सुशोभिकरणामुळे देवरुख शहराच्या लौकिकात अजून भर पडणार आहे.
देवरूख पोलीस ठाण्यासमोर प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचा अनावरण समारंभ २९ मे  १९९२ रोजी तत्कालीन बांधकाम व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ल.र. हातणकर यांच्या हस्ते संपन्न झाला होता.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button