गुहागर – विजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी १७ गावांची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण
गुहागर – विजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी १७ गावांची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या महिनाभरात अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर जानेवारी अखेरपर्यंत जागा मालकांना जमिनीचा मोबदला वितरित करणार असल्याची माहिती चिपळूणचे उपविभागीय अधिकारी आकाश लिंगाडे यांनी दिली. तहसीलमध्ये कामकाजाचा
गुहागर आढावा घेण्यासाठी बुधवारी प्रांताधिकारी आकाश लिंगाडे गुहागरमध्ये आले होते. गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जागेचा मोबदला वितरित करण्यासाठी आपल्याकडे ४३ कोटी रूपये जमा आहेत. आतापर्यंत १७ गावांची
भूसंपादनातील ३ डी प्रसिद्ध झाला असून जागेच्या मोबदल्याचा अवॉर्ड जाहीर केला जात आहे. १७ गावांपैकी १३ गावांनी भूसंपादनासाठी सहकार्य दिले आहे
www.konkantoday.com