खेड तालुक्यातील फुरूस– फळसोंडा येथे घराच्या बाहेरील परड्यात चुलीवर पाणी तापवत असताना भाजल्यामुळे जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू
खेड तालुक्यातील फुरूस– फळसोंडा येथे घराच्या बाहेरील परड्यात चुलीवर पाणी तापवत असताना आगीचा भडका उडून भाजलेल्या ५६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुनिरा दिलयार परकार असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी येथील पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. त्या चुलीवर पाणी तापवत असताना आगीचा भडका उडून गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला
www.konkantoday.com