कोकण रेल्वेचे नॉन-मान्सून वेळापत्रक बिघडलेलेच
कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात आले. मात्र कोकण रेल्वेचे नॉन मान्सून वेळापत्रक लागू झाल्यापासून एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बिघडलेलेच आहे. एलटीटी ते मडगावपर्यंत धावणार्या फेर्यांसाठी स्वतंत्र रेक नसल्याने १ नोव्हेंबरपासून वेगाने धावणार्या एक्स्प्रेस गाड्या ३ ते ४ तास विलंबानेच धावत असल्याने प्रवाशांचा मनस्ताप कायम आहे.
कोकण मार्गावर यापूर्वी धावणार्या डबल डेकर एक्स्प्रेसला ब्रेक लावून गतवर्षी २२ डब्यांची एलएचबी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकानुसार एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस तर नॉन मान्सून वेळापत्रकानुसार आठवड्यातून चार दिवस धावत आहे.
www.konkantoday.com