
आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान बचाव रॅली २९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणार
गणपतीपुळे रिपब्लिकन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर समाजभूषण पुरस्कारांचे म. प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली २४ ऑक्टोबर ते ०६ डिसेंबर २०२३ दीक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी दादर-मुंबई या मार्गाने संविधान बचाव यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या संविधान रॅलीचे २९ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात आगमन होणार आहे.
२९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणार असून राजापूर, लांजा, पाली येथे संविधान रॅलीचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. तसेच रत्नागिरी शहरातील पॉलिटेक्निक कॉलेज समोर सायं. ५.३० वा. मा. आनंदराज आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ३० रोजी संगमेश्वर, तुरळ, आरवली, सावर्डे, चिपळूण-आंबेडकर चौक, बहाद्दूर शेख नाका येथे सायं. ५.३० वा. जाहीर सभा होणार आहे.
www.konkantoday.com