अजूनही थंडीचे अपेक्षित आगमन झालेले नाही. त्यामुळे आंब्याची चव उशिराने चाखायला मिळण्याची शक्यता
दापोली तालुक्यात यावर्षी अजूनही थंडीचे अपेक्षित आगमन झालेले नाही. त्यामुळे आंब्याची चव उशिराने चाखायला मिळण्याची शक्यता बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. सध्या काही आंब्यांच्या झाडांना मोहोर येण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र निसर्गाने साथ दिल्यास फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यापर्यंत आंब्याचे तयार फळ प्राप्त होईल, असे केळशी – आंबवली येथील बागायतदार मनोज केळकर यांनी सांगितले. ऑक्टोबर हीटनंतर थंडीची गरज असताना अद्याप थंडीचा थांगपत्ता नाही. त्यामुळे वृक्षांना पालवी फुटून फळधारणेसाठी सक्रिय हवामान प्राप्त झालेले नाही. मात्र काही बागायतींमध्ये आंब्याच्या झाडांना मोहोर येत आहे. परंतु पाऊस, वारा, माकड यांच्यापासून बचाव झाल्यास फेब्रुवारीपर्यंत फळ खाण्यायोग्य होईल. असा अंदाज बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. परंतु दापोलीत अनेक बागायतदार अजून झाडांना मोहो येण्याची वाट पाहत आहेत.
www.konkantoday.com