वाशिष्ठी नदीतील रस्ता पाणी योजनांच्या मुळावर, ग्रामस्थांना गढूळ, मचूळ आणि खारट पाणी मिळत असल्याने नाराजीचा सूर
गेल्या काही दिवसांपासून उक्ताड-जुवाड बेट येथे काढला जाणारा गाळ बाहेर काढण्यासाठी वाशिष्ठी नदीत रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र तो करताना कोणताही विचार करण्यात आला नसल्याने मिरजोळी, कोंढे, शिरळ आदी गावांच्या पाणी योजना अडचणीत आल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांना गढूळ, मचूळ आणि खारट पाणी मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे येथे पाईप टाकावेत अन्यथा कामाच्या ठिकाणी मोर्चा नेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाशिष्ठी नदीत उक्ताड जुवाड बेट येथे मोठ्या प्रमाणात गाळ काढला जात आहे. या गाळाची वाहतूक करण्यासाठी नदीत मोठे रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र ते तयार करताना पुढे असलेल्या पाणी योजनांचा विचार करण्यात आलेला नाही. या रस्त्यामुळे नदीतील पाणी दोन भागात अडले जात असल्याने वरून पाणी योजनांसाठी आवश्यक असलेेले पाणीच पुढे जात नाही. त्यामुळे मिरजोळी, शिरळ, कोंढे आदी गावांना पाणीपुरवठा करणार्या व नदीतच असलेल्या जॅकवेल ओस पडल्या आहेत.
www.konkantoday.com