नुकसान भरपाई नको, पण वानर-माकडांना आवरा, गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामस्थांची मागणी
गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामस्थांची तालुका प्रभारी वनाधिकारी संजय दुडगे यांच्यासह ग्रामदेवता नवलाई देवी मंदिरात शेतकर्यांना त्रासदायक ठरणार्या वानर, माकडे आणि उपद्रवी वन्य पशुंबाबत उपाय योजनांसंदर्भात बैठक पार पडली. पण वानर-माकडांचा बंदोबस्त करा, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली.
उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी चिपळूण-गुहागर विभागांच्या परीक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर यांना पत्राद्वारे वानर आणि माकडे पकडण्यासाठी पिंजरे किंवा फिरती व्हॅन मिळवण्यासाठी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांसह बैठकीचे आयोजन केले होते.
सदर बैठकीत मौजे उमराठ ग्रामस्थांच्या शेती, पिकांचे व रानडुक्कर या उपद्रवी वन्य प्राण्यांपासून नुकसान होत असल्याबाबतच्या तक्रारींची चौकशी करण्यात आली तसेच वन्य प्राण्यांपासून होणार्या नुकसान भरपाई व त्यासंबंधीचे शासन निर्णय याची माहिती व अधिकारी डुगवे यांनी ग्रामस्थांना दिली.
www.konkantoday.com