देवरूख खालची आळीत बिबट्याची एन्ट्री, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण
देवरूख शहरातील खालची आळी परिसरात सोमवारी रात्री नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. एन्ट्री केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
देवरूख हे संगमेश्वर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. बाजारपेठ व नागरिकांच्या वस्तीने गजबजलेले हे शहर आहे. सोमवारी रात्री ११ वाजता खालची आळी येथील मिशाळे कॉम्प्लेक्स येथे नागरिकांना चक्क बिबट्याचे दर्शन झाले. दोनवेळा रस्ता पार करताना व घराजवळ दडी मारून बसलेल्या स्थितीत हा बिबट्या नागरिकांना दिसून आला. तरूणांनी आरडाओरड करून या बिबट्याला वस्तीतून हाकलवून लावल्याने बिबट्याने जंगलात धूम ठोकली. लहान बालके, महिला वर्गासह नागरिकांची या मार्गावरून ये-जा असते. भरवस्तीत बिबट्याने एन्ट्री केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
www.konkantoday.com