
जात, अधिवास दाखल्याची अट शिथिल करा, माजी शिक्षण सभापती दीपक नागले
मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी विधवा महिलेचा जातीचा दाखला प्रस्तावासोबत असणे गरजचे आहे. मात्र जातीच्या दाखल्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना आधीच दमछाक होत आहे. अशा स्थितीमध्ये वयस्कर असलेल्या विधवा महिलेच्या जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची शोधाशोध कुठे आणि कशी करायची? आणि लाभार्थ्यांनी लाभ घ्यायचा कसा? असाा सवाल कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा तालुका राजापूरचे अध्यक्ष आणि ग्रामीण शाखा तालुका राजापूरचे अध्यक्ष आणि माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी उपस्थित केला आहे.
मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या जातीचा दाखला, अधिवास दाखला या कागदपत्रांची अट शिथिल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संबंधित पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांना निवेदन देण्यात आले असून त्यांच्याशी आपली चर्चाही सविस्तरपणे झाली आहे. त्यामध्ये मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यामध्ये येणार्या अडचणीसंबंधी चर्चा करण्यासाठी लवकरच प्रशासकीय बैठक आयोजित करण्याचे त्यांनी आश्वासित केल्याची माहिती नागले यांनी दिली.
www.konkantoday.com