
कॉलेज तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अखेर अटकेत
संगलट (खेड)( प्रतिनिधी )*
दिनाक 21/11/2023 रोजी सायंकाळी 04.00 वाजेच्या सुमारास मुंबई गोवा हायवेवर मौजे वेरल खोपी फाटा ता. खेड येथे गवडा कंट्रक्शन गोडावुनचे समोर रस्त्यावर एक मुलगी पायी चालत जात असताना आयशर टेम्पो क्र.एम.एच.०४/के.एफ/९८२९ वरील अनोळखी चालकाने त्याचे ताब्यातील टेम्पो रस्त्याचे डावे बाजुस उभा करुन टेम्पोतुन उतरुन त्या मुली सोबत विनयभंग करू लागला होता त्यानंतर ती मुलगी आरडा ओरडा करू लागली तेवढ्यात तिथे एक दुचाकी स्वार येऊन थांबल्याने अनोळखी इसम हा डोंगरमय जंगलात पळून गेला.
सदरचा सर्व प्रकार पोलीस ठाणे येथे समजताच खेड तालुक्याचे व पोलीस ठाण्याचे लोकप्रिय नितीन भोयर पोलीस निरीक्षक खेड यांच्या
मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मौजे वेरल खोपी फाटा येथे सदर
अनोळखी इसमाचा शोध घेतला असता सदर इसम मिळून आलेला असून सदर इसम हा डोंगरमय जंगलात
पळून जात असताना तिथे पडून त्याच्या हाता पायाला दुखापत झालेली आहे सध्या सदर इसम हा उपचाराकरिता
उपजिल्हा रुग्णालय कलंबणी येथे असून तिथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेल्या आहे. सदर इसमाच नाव
प्रथमेश विष्णु घाडगे वय-२५ वर्षे व्यवसाय-ड्रायव्हर रा. कुवारबांव कातळवाडी ता. जि. रत्नागिरी असे असून सदर
इसम याचे विरुद्ध खेड पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर 350/2023 भा.द.वि.स.क. 354, 354(अ), 323 प्रमाणे
दाखल करून पुढील तपासकाम सुरू आहे. सदरची कारवाई ही . धनंजय कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोो.
रत्नागिरी, श्रीमती जयश्री गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक सोगा. रत्नागिरी व श्री राजेंद्र मुणगेकर उपविभागीय
पोलीस अधिकारी सो. खेड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नितीन भोयर व त्यांच्या
स्टाफने केलेली आहे.
तसेच महीला व बालकांच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे व अपराध मधील आरोपींवर कठोर कारवाई करणे
अशी स्पष्ट भूमिका माननीय धनंजय कुलकर्णी पोलीस अधीक्षक रत्नागिरी असल्याने याबाबत सर्वत्र माहिती
घेऊन कार्यवाही सुरू आहे. खेड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास सुरू आहे
www.konkantoday.com