आयसीआयसीआय बँकेतून बोलतोय असे भासवून६२ हजाराची ऑनलाईन फसवणूक
आयसीआयसीआय बँकेतून बोलतोय असे भासवून मोबाईलवर पाठवलेली लिंक डाउनलोड केल्यानंतर त्यातूनच ६२ हजर ७७३ रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. याबाबतची फिर्याद अमर अनिल नलावडे (३३, चिपळूण) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमर हा त्याच्या घरी असताना त्याच्या मोबाईलवर अज्ञाताने फोन करून आयसीआयसीआय बँकेतून बोलतोय असे भासवले. यावेळी अमर याच्या क्रेडीट कार्डची माहिती विचारणा केली. तसेच त्याच्या मोबाईलवर पाठवण्यात आलेली लिंक अज्ञाताने डाऊनलोड करण्यास भाग पाडले. यातच अमर याच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट कार्ड खात्यातून सहावेळा व्यवहार करुन ६२ हजार ७७३ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार अमर याच्या लक्षात येताच त्याने चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com