मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत आयोजितराज्यस्तरीय विधवा प्रथा बंद ‘माझे मत’ लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर, युगनायिका सावित्रीबाई फुले ‘क्रांतीज्योती लेखणी’ सन्मान २०२३ पुरस्कार जाहीर
गेली २८ वर्ष सामजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,आरोग्य,साहित्य,पत्रकारिता, पर्यावरण आणि एडस आदी क्षेत्रात कार्यरत असलेली रत्नागिरी जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत(ता. चिपळूण)या संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विधवा प्रथा बंद ‘माझे मत’ लेखन स्पर्धा २०२३ या शीर्षकांतर्गत स्पर्धेचा निकाल संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांनी नुकताच जाहीर केला आहे.
सदर स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रज्ञावंत समाजघटकांनी सहभाग नोंदवून हि स्पर्धा यशस्वी केली.या लेखन स्पर्धेत सर्वोत्तम दहा विजेत्या स्पर्धकांची युगनायिका सावित्रीबाई फुले ‘क्रांतीज्योती लेखणी’ सन्मान २०२३ या पुरस्काराकरिता निवड झाली आहे. त्यात दापोलीचे सुपुत्र कवी जयवंत नारायण चव्हाण यांचा समावेश आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत डिसेंबर मध्ये खास समारंभात त्यांना युगनायिका सावित्रीबाई फुले ‘क्रांतीज्योती लेखणी’ सन्मान २०२३, पदक आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
www.konkantoday.com