मराठा-कुणबी व कुणबी-मराठाउपलब्ध पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे विशेष कक्षात 21 ते 24 नोव्हेंबर कालावधीत जमा करावेत
*रत्नागिरी, (जिमाका):
7 सप्टेंबर च्या शासन निर्णयान्वये मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र जिल्ह्यातील पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहित करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इ. जुनी अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात दिनांक 21 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
7 सप्टेंबर च्या शासन निर्णयान्वये मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र जिल्ह्यातील पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहित करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा जिल्हानिहाय दौरा प्रसिध्द करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने, या समितीने दिनांक 17 नोव्हेंबर 2023 च्या पत्रात दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध
असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी
दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इ. जुनी अभिलेखे स्वीकारण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे,
संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इ. जुनी अभिलेखे
जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथील स्थापित विशेष कक्षात दिनांक
21 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com