
रत्नागिरी, राजापूर आणि गुहागर मतदारंसघात नाराजांचा बंडाचा झेंडा.
रत्नागिरी तालुक्यात निष्टावंत ठाकरे शिवसैनिक उदय बने यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. राजापूर तालुक्यातही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेवदवार शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बंडखोरी केली आहे, तर गुहागर तालुक्यात देखील बंडखोरी झाली आहे.विधानसभा निवडणुकीची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून रिंगणात असलेल्या उमेदवारांनी निःश्वास सोडला आहे. आता उमेदवारांपुढे बंडखोरी थांबविण्याचे आव्हान आहे. जिल्ह्यात पाच मतदारसंघापैकी रत्नागिरी, राजापूर आणि गुहागर मतदारंसघात नाराजांनी बंडाचा झेंडा दाखवला आहे. रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेचे उदय सामंत विरुद्ध उबाठा शिवसेनेचे बाळ माने अशी थेट लढत अपेक्षित आहे. याठिकाणी अपक्षांचा भरणा आहे. परंतु ठाकरे सेनेला बनेंचे बंड शमविण्याची चिंता आहे.