
कमी निधीमध्ये जिल्ह्याचा विकास कसा होणार? -माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र
सिंधुुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून राज्य सरकारने सिंधुुदुर्ग जिल्ह्याला वाढीव निधी देणे आवश्यक होते. मात्र राज्य शासन असे न करता जिल्ह्याला प्राप्त झालेला निधी मागे घेत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास कसा होणार? अशी जोरदार टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. हे सरकार राज्य चालविण्यास अपयशी असल्याचाही आरोप राणे यांनी केला. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ सर्वे करावा. तसेच कोरोना कालावधीत गावपातळीवर काम करणार्या सरपंचांना तातडीने निधी द्यावा, अशी सूचना नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी के. मंज्जुलक्ष्मी यांना भेटून केली.
जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यासाठी आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. कोरोना रूग्णांनाही सुविधा मिळत नसल्याचेही राणे यांनी सांगितले.
www.konkantoday.com