फरारे पुलाचा जोडरस्ता बनलाय धोकादायक
दापोली तालूक्यात ऐकमेव गरम पाण्याचे कुंड असलेल्या सुप्रसिध्द उन्हवरे या गावाहून फरारे गावाला जोडणा-या पुलावरूनच फरारे येथील जेटीवरून परचुरी मार्गे गुहागरला जाता येते. त्यामुळे खेड आणि दापोली तालूक्यातील खाडी पट्टा भागातील कित्येक गावांमधील रहीवाशांना उन्हवरे फरारे पुल प्रवाशी वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचा असा पुल आहे. अशा या पुलाच्या जोड रस्त्याच्या सांध्यात चर पडले आहे. या पडलेल्या चराची रूंदी वाढत चालली आहे त्यामुळे प्रवाशी वाहतुकीसह पादचा-यांसाठी हा पुल धोक्याचा झाला आहे. या मार्गावरील प्रवाशी आणि वाहनांची वर्दळ पाहता अपघाताची वाट न पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुल आणि जोडरस्त्या दरम्यान सांध्यात पडलेला चर बुजवून टाकला तर या पुलावरून होणारी वाहतुक ही सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होणार आहे.
www.konkantoday.com