लोटे सीईटीपी मधून दाभोळ खाडीत येणाऱ्या सांडपाणी पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी २२ कोटीच्या कामाला प्रशासकीय मान्यता
लोटे सीईटीपी मधून दाभोळ खाडीत येणाऱ्या सांडपाणी पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी २२ कोटीच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्याबरोबरच खाडीकडे जाणाऱ्या नाल्यांची खोली उंची आणि वाढवण्यासंदर्भातील खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील बैठकीत दिल्या. त्यामुळे २१ नोव्हेंबर रोजी आरंभलेले आंदोलन दाभोळ खाडी परिसर संघर्ष समितीने मागे घेतले आहे.
प्रदूषणप्रश्नी दाभोळ खाडीतील शुक्रवारी उद्योगमंत्री सामंत यांनी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांच्या उपस्थितीत प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, सीईटीपी अधिकाऱ्यांची बैठक दाभोळ खाडी संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांसमवेत घेतली. यावेळी करण्यात आलेल्या विविध माहिती उद्योगमंत्री सामंत यांनी दिली.
www.konkantoday.com