राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला करून फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा खून केला-प्राध्यापक नामदेव जाधव


अभ्यासक आणि प्राध्यापक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासल्याने एकच खळबळ उडाली आहे.हल्ल्यावरून नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादीवरच हल्ला चढवला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला करून फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा खून केला आहे, असं सांगतानाच राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांची नावे आपण एफआयआरमध्ये लिहिणार असल्याचं नामदेव जाधव यांनी म्हटलं आहे.

हल्ला झाल्यानंतर नामदेव जाधव यांनी एका व्हिडीओद्वारे आपली भूमिका मांडली. तसेच या हल्ल्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचा निषेध नोंदवला. पुण्यात मराठा आरक्षणाची भूमिका मांडत असताना माझ्यावर हल्ला झाला. मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार असल्याचे कागदपत्र माझी हाती लागले होते. ते वास्तव असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ते पटलं नाही. त्यामुळेच माझ्यावर हल्ला करण्यात आला, असं नामदेव जाधव यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाची वास्तव माहिती देण्याचा माझा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला. त्यानंतर पत्रकार परिषद सुरू असताना त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी असं समजतो की शीव, फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या गुंडांनी हा हल्ला केला आहे. त्यांनी एकप्रकारे शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचा खून केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगभर जाऊ नये म्हणून त्यांनी केलेला हा हल्ला आहे, अशी टीका जाधव यांनी केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button