
भारताचे स्वप्नभंग; ऑस्ट्रेलियाची सहाव्यांदा विश्वचषकावर मोहर
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव करत भारताचे स्वप्नभंग केले आहे. कांगारूंनी सहाव्यांदा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने दिलेल्या २४१ धावांच्या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने यशस्वीरित्या पाठलाग केला.ट्रायव्हस हेडची शतकी खेळी आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता.
www.konkantoday.com