
केरळला निघालेल्या रेल्वे प्रवाशाचा रेल्वे प्रवासातच मृत्यू
केरळला निघालेल्या रेल्वे प्रवाशाचा रेल्वे प्रवासातच मृत्यू झाला.ही घटना शुक्रवार 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.45 वा.रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली.सलीम पी.एम (55,रा.केरळ) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.ते आजारी असल्याने अधिक उपचार करण्यासाठी तसेच विश्राम करण्यासाठी आपल्या गावी केरळला जात होेते.ते नेत्रवल्ली एक्सप्रेसने मुंबई ते केरळ असा प्रवास करत असताना रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे त्यांना अस्वस्थ वाटून घाम फूटू लागला.रेल्वेतील टी.सी आणि रेल्वे पोलिसांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी सलीम पी.एम यांना तपासून मृत घोषित केले.
www.konkantoday.com