खेड तालुक्यातील नांदगाव मोहल्ला येथे भर लोकवस्तीत मगर आढळली.
खेड तालुक्यातील नांदगाव मोहल्ला येथे भर लोकवस्तीत शुक्रवारी मगर आढळली. याची माहिती अनिल खोपकर यांनी दुरध्वनीव्दारे वन विभागाला दिली. त्यानंतर या मगरीला पकडून सुरक्षित अधिवासात वनविभागाच्या वन्यप्राणी बचाव पथकाने सोडले.
चिपळूण वनविभागाने नव्याने विकसित केलेल्या लोखंडी पिंजऱ्यात वनविभागाच्या अधिकारी व
५ कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षितरित्या या मगरीला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून देण्यात आले. या बचावकार्यात वनपाल सुरेश
उपरे, वनरक्षक परमेश्वर डोईफोड, रानबा बंबगेकर, अशोक ढाकणे, वन्यजीव रक्षक सर्वेश पवार, रोहन खेडेकर, श्वेत चोगले सूरज जाधव, सुमित म्हाप्रळकर, आकाश उसरे, प्रथमेश गिमवणेकर, विशाल सौंदर्य व ग्रामस्थ याने सहभाग घेतला
www.konkantoday.com