राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात गोवा बनावटीच्या विदेशी दारूची राजरोसपणे विक्री
राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात गोवा बनावटीच्या विदेशी दारूची राजरोसपणे विक्री सुरू आहे
राज्यात शासन-प्रशासन कार्यरत आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी स्थिती राजापुरात ओढवली आहे. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या राजरोसणे • सुरू असलेल्या वाहतूक व विक्रीविरोधात जनतेतूनच तक्रारी झाल्यानंतर याबाबत वर्तमानपत्रांनी आवाज उठवूनही शहरासह ग्रामीण भागात उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिच्चून खुलेआमपणे भर दिवाळीत गोवा बनावटीची विदेशी दारू घेऊन गाड्या दाखल होत आहेत आणि त्याची राजरासपणे विक्रीही सुरू आहे.
त्यामुळे या व्यवसायाला राज्य शुल्क विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद असल्याची चर्चा आता होत आहे. शासनाचाच दैनंदिन हजारो रूपयांचा महसुली कर यामुळे बुडत असून त्यालाही राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.
www.konkantoday.com