2027 पर्यंत सर्व प्रवाशांना कन्फर्म ट्रेन तिकीट मिळणार


सणासुदीच्या काळात ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. विशेषत: दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त (दिवाळी-छट स्पेशल ट्रेन) लोक आपापल्या घरी जातात. अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळणे जवळपास अशक्‍य होऊन बसते.त्यामुळे अनेकांना काउंटरवरून वेटिंग तिकीट काढून ट्रेनमध्ये उभे राहून प्रवास करावा लागत आहे. भारतीय रेल्वे आता ही समस्या संपवणार आहे. आतापासून चार वर्षांत म्हणजे 2027 पर्यंत सर्व प्रवाशांना कन्फर्म ट्रेन तिकीट मिळेल. त्यासाठी भारतीय रेल्वेच्या ताफ्यात तीन हजार नव्या गाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

सध्या दररोज 10748 ट्रेन धावत आहेत. ते 13000 गाड्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. रेल्वे दरवर्षी ट्रॅक वाढवत आहे. आता 4 ते 5 हजार किलोमीटर ट्रॅकचे नवीन जाळे तयार करण्यात आले आहे. पुढील 3-4 वर्षात आणखी 3000 नवीन गाड्या रुळावर आणण्याची योजना आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button