लोकनेते शामराव पेजे यांच्या रत्नागिरी शहरातील माळनाका येथे असलेल्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी
लोकनेते शामराव पेजे यांच्या रत्नागिरी शहरातील माळनाका येथे असलेल्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रत्नागिरी यांच्यावतीने करण्यात आली आहे. त्या संदर्भात मागणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुदेश मयेकर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी एम. एस. बोरकर यांना निवेदन देण्यात आले. लोकनेते कै. शामरावजी पेजे यांच्या पुण्यतिथीनिमित्त n
गुरूवारी कै. शामरावजी पेजे यांच्या माळनाका येथील पुतळ्याला विनम्र अभिवादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी यांच्यावतीने करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष सिध्देश शिवलकर, युवक विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष संकेत कदम, युवक जिल्हा कार्याध्यक्ष नौसीन काजी, युवक तालुका अध्यक्ष राजेश भाटकर, जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ गराटे. जिल्हा खजिनदार रणजित शिर्के ओबीसी सेल शहराध्यक्ष पंकज पुसाळकर, महिला विधानसभा क्षेत्राध्यक्ष नसिमा डोंगरकर महिला तालुका अध्यक्ष शमीम नाईक महिला शहराध्यक्ष नेहाली नागवेकर अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आलिया मजगावकर आधी जण उपस्थित होते
www.konkantoday.com