एलपीजी गॅस सिलेंडर एजन्सी मिळाल्याचे सांगून पैसे उकळले, पाच लाख वीस हजार रुपयांची फसवणूक

तुमची एलपीजी गॅस एजन्सी फिक्स झाली असून तसा ईमेल पाठवून वायंगणी फाटा येथील संतोष बिडू यांची पाच लाख वीस हजार रुपयाची फसवणूक होण्याचा प्रकार घडला आहे

रत्नागिरी तालुक्यातील वायंगणी फाटा येथील राहणारे संतोष बिडू यांनी आपल्या मोबाईलवर गुगलवर एलपीजी गॅस सिलेंडर डीलरशिप ची जाहिरात पहिली होती त्याबाबत त्यांनी आपला भाचा सुर्वे व अन्य नातेवाईकांशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते ही एजन्सी घेण्याचे ठरले त्याप्रमाणे फिर्यादी यांनी एलपीजी गॅस एजन्सी फॉर्म डाउनलोड करून घेतला फिर्यादी यांनी सदर चा फॉर्म भरून इन्फो ऑल इंडिया गॅस एजन्सी इन या ईमेलवर भरून इमेल केला त्यानंतर चार दिवसांनी एलपीजी वितरण चलन कंपनीकडून आशिष शृंखला याने फोन करून फिर्यादी यांना तुमची एजन्सी फिक्स झाल्याचे कळवून ओबीसी वर्गासाठी सात हजार पाचशे रुपये भरावे लागणार आहेत ते भरावे असे सांगितल्यावर फिर्यादी याने भाच्याला सांगून ते पैसे भरले हे पैसे मिळाल्याचे कंपनीने ई-मेलवरून कळविले त्यामुळे फिर्यादी यांचा विश्वास बसला त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून डीलरशिप सर्टिफिकेटसाठी 64,9
00ओ सी सर्टिफिकेट करता 96 हजार चारशे रुपये व गॅस सिक्युरिटी डिपॉजिट म्हणून तीन लाख 52 हजार रुपये आपल्या कॅनरा बँक शाखा विजयवाडा मधील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड चे नावे अकाउंटवर भरण्यास सांगितले तसेच काही पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया चेंबुर मुंबई या अकाउंट वर करण्यास सांगितले सदरचे पैसे फिर्यादी यांच्या भाच्याने कंपनीच्या अकाउंट वर जमा केले परंतु तीन महिने उलटूनही याबाबत पुढे काही हालचाली झाल्या नाहीत म्हणून फिर्यादी यांनी आपला मित्र सुभाष मुळे राहणार मुंबई यांना यासंबंधीची माहिती दिली नंतर त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन च्या ेंबूर येथील संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात आला त्यावेळी त्यांना फिर्यादी यांना कंपनीने दिलेली कागदपत्रे दाखवली असता त्यांनीही कागदपत्रे पाहून हे प्रकरण बोगस असल्याचे सांगितले त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पूर्णगड पोलीस स्थानकात याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button