रत्नागिरी शहरा नजीकच्या खेडशी नॅनोसीटी येथे युवकाने गळफास घेवून आत्महत्या
रत्नागिरी शहरा नजीकच्या खेडशी नॅनोसीटी येथे युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली. प्रसाद राजाराम पाचकले (२५, रा. नॅनोसीटी, रत्नागिरी) असे युवकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसाद पाचकले हा घरी एकटा होता. रात्रीच्या सुमारास प्रसाद याने कोणत्यातरी घरगुती कारणावरून पंख्याला नायलॉनच्या लटकवून गळफास घेवून आत्महत्या केली. अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे.
www.konkantoday.com