रत्नागिरीतील प्राणी संग्रलयाचे काम १ डिसेंबरला सुरु करण्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी दिले आदेश७५ कोटीचे इस्टीमेन्ट असून ३ कोटी ८५ लाख रुपये भुसंपादनसाठी केले वर्ग


आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे होऊ घातलेल्या प्राणी संग्रहालय उभारणे संदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या दालनात घेतली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून प्राणी संग्रहालयाच्या एम ओ यु प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून प्राणी संग्रहालयाच्या वॉल कंपाऊंड साठी ३ कोटी ८५ लाख रुपये जमिनीच्या भूसंपादन साठी दिले आहेत.एमआयडीसी ला ५ कोटी वर्ग करण्यात येणार असून प्राणी संग्रहाच्या वॉल कंपाउंड चे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश यावेळेस राज्याचे उद्योग मंत्री- रत्नागिरी- रायगडचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांनी दिली आहेत. या कामासाठी सिंधू रत्न मधून दहा कोटी देणार असून एक डिसेंबर पर्यत कामाला सुरवात करण्याचे आदेश यावेळी पालकमंत्री यांनी दिले आहे. प्राणी संग्रालय हा रत्नागिरीमधील महत्वाचा प्रोजेक्ट असून तो पूर्ण करण्याची मानसिकता अधिकारी वर्गाने ठेवून जोमाने कामाला लागण्याचे सूचना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी चिपळूण – संगमेश्वरचे आमदार शेखर निकम,अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिह्वा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कीर्तिकीरण पुजार, उपमुख्यकार्यकरी अधिकारी श्री. यादव, प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी भरत चौघुले,तहसीलदार राजाराम म्हात्रे, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button