
मध्य प्रदेशात २३० जागांसाठी तर छत्तीसगडमध्ये ७० जागांसाठी मतदान
भारतीय निवडणूक आयोगाकडून देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यानुसार आज (दि.१७) मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले
मध्य प्रदेशात भाजपचे सरकार असून, येथे गड राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. तर छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता असून, काँग्रेससमोर सत्ता कायम ठेवण्याचे तर भाजपसमोर सत्ता परिवर्तनाचे आव्हान असणार आहे. मध्य प्रदेशात २३० तर छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ७० जागांसाठी मतदानाला आज (दि.१७) सकाळी सुरुवात झाली. यापूर्वी छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान मंगळवारी ७ नोव्हेबर रोजी पार पडले.
मध्य प्रदेशातील २३० जागांसाठी एकूण २,५३३ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्येच प्रमुख लढत आहे.
www.konkantoday.com