जिल्हा भाजपा महिला मोर्चा सरचिटणीसपदी वर्षा ढेकणे


रत्नागिरी शहरातील तेली आळी येथील रहिवासी व भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या वर्षा परशुराम उर्फे दादा ढेकणे
यांची भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली.
रत्नागिरी भाजपाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ढेकणे यांची पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांची भाजपा जिल्हा महिला मोर्चाच्या सरचिटणीसपदी वरिष्ठांकडून नियुक्ती करण्यात आली. दरम्यान गरीब व गरजू महिलांसाठी त्यांचे विशेष योगदान आहे. अनेक बचत गटांना सहकार्य करून महिला सक्षमीकरणाला बळ देण्याचे काम त्या करीत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button