
दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील उर्वरित १० गावे ही इनोव्हेटिव्ह म्हणून जाहीर करा-स्टॅलिन दयानंद
दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील २५ गावे “इको सेन्सेटिव्ह झोन” म्हणून जाहीर करण्यात आली आहेत आता उर्वरित १० गावे ही इनोव्हेटिव्ह म्हणून जाहीर करा त्यामुळे ३२ हून अधिक मायनिंग प्रकल्प बंद होणार आहेत.असा विश्वास वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी व्यक्त केला.आपण अर्धी लढाई जिंकली आहे. पण न्यायालयाच्या निर्णया ची सरकारकडून योग्य ती अमलबजावणी होत नसल्यानेच शेकडो एकर जमिनीत वृक्षतोड सुरू असा दावा ही दयानंद यांनी केला. १४ वर्षांच्या लढाईला यश मिळाल्याने तसेच सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील 25 गावे सेन्सेटिव्ह झोन म्हणून जाहीर झाल्यानंतर प्रथमच सावंतवाडीत स्टॅलिन दयानंद यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी डॉ. जयेंद्र परुळेकर, संदिप सावंत, नंदकुमार पवार अस्मीता एम के यांच्यासह दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.www.konkantoday.com