कुडाळ तालुक्यातील रांगणातुळसुली ख्रिश्चनवाडी येथे दोन सख्ख्या भावांमध्ये मारहाणीचा प्रकार ,फावड्याने केलेल्या वारामुळे लहान भावाच्या हाताचे बोट तुटून पडले
वडिलोपार्जित जमीनीच्या वादातून कुडाळ तालुक्यातील रांगणातुळसुली ख्रिश्चनवाडी येथे दोन सख्ख्या भावांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला. यामध्ये मोठ्या भावाने फावड्याने केलेल्या वारामुळे लहान भावाच्या हाताचे बोट तुटून पडले.शरद रामचंद्र गोवेकर (वय ५१) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
रांगणातुळसुली ख्रिश्चनवाडी येथे बुधवारी (१५ नोव्हेंबर) सायंकाळी दोन भावांमध्ये हाणामारी झाल्याची कुडाळ पोलिसांत देण्यात आली. या तक्रारीवरून तिघांवर कुडाळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com