
महामार्गावरील आरवली-वाकेड दोन्ही टप्प्यांचे काम बंद
केंद्र सरकारसह राज्य सरकारकडून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षात पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात असले तरी आवरली ते बावनदी, बानवदी ते वाकेड या दोन टप्प्यातील कामांचे विघ्न अद्याप कायम आहे. ठेकेदार असलेली रोडवेज सोल्यूशन कंपनी आर्थिक संकटात सापडल्यामुळे या दोन्ही टप्प्यातील कामे ठप्प झाली आहे. दोन्ही टप्प्यांसाठी ठेकेदार बदलण्याची प्रक्रिया महामार्ग प्राधिकरणाने सुरू केली आहे. आरवली ते बावनदी टप्प्याचा नवा ठेकेदार निश्चित झाला असून बावनदी ते वाकेड टप्प्याचा ठेकेदार बदलाचा प्रस्ताव दिल्ली दरबारी पाठविण्यात आला आहे. यामुळे महामार्ग लवकर पूर्ण होण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. तर दोन्ही टप्प्यातील केवळ ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
www.konkantoday.com