आमदार, मंत्र्यांना गावबंदी, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय रे?” छगन भुजबळांची मनोज जरांगे यांच्यावर टीका


जालनाच्या अंबड तालुक्यात ओबीसी नेत्यांची मोठी सभा आयोजित करण्यात आली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी भाषण केलं. छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली.उपोषण केलं, काय झालं? पोलिसांचा लाठीचार्ज झाला. पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला. पण 70 पोलीस, महिला पोलीसही रुग्णावयात दाखल झाले. दगडांचा मार खाऊन जखमी झाले. काय झालं? याला उठवायला अगोदर गेले. हे म्हटले, मी जरा झोपलोय, नंतर या. पोलीस गेले. ऐका आता, गच्चीवरुन त्यांनी सगळी तयारी तोपर्यंत करुन ठेवली. महिला होत्या त्याला संबोधित करण्यासाठी तिथे महिला पोलीस आल्या. त्यांनापण आणलं. जसं त्यांना निवेदन केलं तेवढ्यात दगडांचा प्रचंड मारा सुरु झाला. पोलीस फटाफट जमिनीवर पडले. पोलीस काय पाय घसरुन पडले का? त्यांना कोणी मारलं? हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शिंदे गटाच्या नेत्या गोऱ्हे असतील, त्या महिला पोलिसांच्या घरी जा. तुम्हाला आम्ही पत्ते देतो. त्यांच्यावर काय बितली ते त्यांच्याकडून वधवून घ्या. काय झालं ते तुम्हाला सांगतील”, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं. “छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सूनेला देखील आई म्हणून परत पाठवलं. तुम्ही आमच्या महिला पोलिसांवर हात उचलले, लाज वाटली नाही तुम्हाला?”, असा घणाघात छगन भुजबळांनी केला. हे सगळं झाल्यानंतर लाठीचार्ज सुरु झाला”, असा दावा भुजबळांनी केला.आमच्या राज्यकर्त्यांना काय सांगायचं, एक दिवस आलं, परत सगळं बंद झालं. पोलिसांची बाजू आलीच नाही. एकच बाजू आली की, पोलिसांनी लाठीचार्ज केला. महिला पोलिसांवर हल्ला झाला मग करायचं काय? लष्कर भी तुम्हारा, सरदार भी तुम्हाला है, तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है, इस दौर के फर्यादी जाए तो जाए कहाँ, अभी राज्य भी तुम्हारा और दरबार भी तुम्हारा हैं”, असं छगन भुजबळ शायरीतून म्हणाले. “आमदार, मंत्र्यांना गावबंदी, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय रे?”, असा सवाल छगन भुजबळांनी केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button