
वाहनाचे हप्ते न भरता वाहन गहाण ठेवून फसवणूक केली गुन्हा दाखल
विश्वासाने दिलेल्या चारचाकी वाहनाचे दोन हप्ते भरल्यानंतर उर्वरित हप्ते न भरले नाहीत. शिवाय चारचाकीचा ताबाही मालकास दिला नसल्याने यातूनच ९० हजारच्या फसवणुकीचा प्रकार चिपळूण उक्ताड येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगळवारी चिपळूण पोलिसांनी एकावर
स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नासीर शकिल टाके
(चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. याबाबतची फिर्याद फैसल नजीरखान सरगुरो (३८, चिपळूण) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फैसल सरगुरो व नासीर टाके हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
सरगुरो यांचा वाहने खरेदीविक्री करण्याचा व्यवसाय असल्याने व नासीर टाके हा त्यांच्या ओळखीचा आसल्याने ऑगस्ट २०२२मध्ये त्यांनी स्वतःची चारचाकी नासीर टाके याच्याकडे विश्वासाने दिली होती मात्र त्याने सुरुवातीचे दोन हप्ते भरले मात्र पुढे हप्ते न भरता गाडीचा ताबा आपल्याकडे ठेवून ही गाडी गहाण ठेवून फसवणूक केली
www.konkantoday.com