
रत्नागिरी शहरालगतच्यामिरजोळेत विहिरीत उडी मारून महिलेची आत्महत्या
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे पडवेवाडी येथे विहीरीत उडी मारून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ३.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. स्वप्नाली शांताराम तांबे (४४, रा. पडवेवाडी मिरजोळे) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नाली तांबे या मानसिक
विकारामुळे आजारी होत्या. त्यांच्यावरमागील काही वर्षापासून उपचार करण्यात येत होते. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ३.३० वाजता त्यांचा मृतदेह विहीरीच्या पाण्यात आढळून आला. या घटनेची नोंद तातडीने रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात आली.
www.konkantoday.com