मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव ओटव फाटा येथे दुचाकी व कार अपघात, दुचाकी स्वार जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव ओटव फाटा खालची मुस्लिमवाडीजवळ (मंगळवार) सायंकाळी ३:३० च्या सुमारास दुचाकी व कार यांच्यात अपघात झाला.गोव्याहून पुणे येथे जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
हा अपघात निव्वळ मिडलकट चालू असल्यामुळे झाल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताला सर्वस्वी जबाबदार हायवे प्राधिकरण आणि केसीसी कंपनी आहे अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हे असेच चालू राहिले तर, कायदा हातात घ्यावा लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
अपघातांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने सष्टेंबर महिन्यात खारेपाटण ते कणकवली पर्यंत असलेले सर्व अनधिकृत मिडलं कट बंद करावेत अशी मागणी केली होती.
www.konkantoday.com