
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कट्टा येथे 130 फूट लांबीच्या राष्ट्रध्वजासह तिरंगा रॅली
संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकारलेल्या हर घर तिरंगा हा उपक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कट्टा येथे भारतीय जनता पार्टी मालवण व कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा रॅली काढण्यात आली.यावेळी 130 फूट लांबीचा भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन ही रॅली वराडकर हायस्कूल- कट्टा बाजारपेठ येथून कट्टा पेट्रोल पंप ते पुन्हा बाजारपेठ येथून वराडकर हायस्कूल येथे अशी फिरविण्यात आली.




