नाना पाटेकर चाहत्यावर भडकले; वाजवली सणसणीत कानाखाली
मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारे अभिनेते नाना पाटेकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा आगामी सिनेमांमुळे चर्चेत असतात. पण आता नाना एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.नाना आता चाहत्यावर भडकले आहेत. चाहत्याच्या त्याने सणसणीत कानाखाली वाजवली आहे. नानांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा सिनेमातील सीन असल्याचा दावा दिग्दर्शकाने केला आहे.
अभिनेते नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाना सध्या बनारसमध्ये आहेत. सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याच्या त्यांनी कानाखाली वाजवली आहे. नाना पाटेकर बनारसमध्ये त्यांच्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत होते. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांचा एक चाहता सेल्फी घेण्यासाठी आला. दरम्यान नानांनी थेट चाहत्याच्या कानाखाली वाजवली.नानांनी कानाखाली वाजवल्यानंतर त्या संबंधित चाहत्याला सेटवरुन हकलण्यात आले. नानांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्याला सेल्फी न देता त्याच्या कानाखाली वाजवल्याने सोशल मीडियावर नानांना ट्रोल करण्यात येत आहे. पण आता दिग्दर्शक अनिल शर्मांनी दावा केला आहे की,”हा सिनेमातील एक सीन आहे.