दापोली तालुक्यामधील वेणंद बौद्धवाडी येथीलमहिलेचा विहिरीत पडून मृत्यू
दापोली तालुक्यामधील वेणंद बौद्धवाडी येथील नंदा धोत्रे या ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.०० वाजण्याच्या दरम्यान घडली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदा धोत्रे सोमवारी सकाळी ९.३० वाजता घरून बाहेर पडल्या होत्या. त्या भोंजळी-शिवाजीनगर येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत मृतावस्थेत आढळून आल्या. याबाबत दापोली पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे
www.konkantoday.com